रिओ : भारताच्या महिला मेडलिस्टमध्ये पी व्ही सिंधू हीने सर्व महिला मेडलिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
आतापर्यंत भारताच्या चार महिलांनी ब्राँझ मेडल पटकावले होते. त्यात वेटलिफ्क्टर कर्णम मल्लेश्वरी, बॉक्सर एम सी मेरी कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ब्राँझ मेडल पटकावले आहे.
पण पी व्ही सिंधून फायनलमध्ये प्रवेशच केला तेव्हाच इतिहास रचला होता. तिने सिल्व्हर मेडल फिक्स केले होते. आज सिंधूने सिल्व्हर पटकावले आणि वरचा क्रमांकही पटकावला.
वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी (सिडनी 2000), बॉक्सर एमसी मैरीकोम (लंडन 2012), बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (लंडन 2012) आणि पहेलवान साक्षी मलिक (रियो 2016) भारत यांनी भारतासाठी मेडलची कमाई केली होती.