सिंधूचा सरकारी अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, हिचा आंध्र प्रदेश सरकारमध्ये अ वर्ग पदावर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

Updated: May 16, 2017, 11:06 PM IST
सिंधूचा सरकारी अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा  title=

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, हिचा आंध्र प्रदेश सरकारमध्ये अ वर्ग पदावर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

सिंधूची सरकारी अधिकारी पदावर थेट नियुक्ती व्हावी याकरता, आंध्र प्रदेश विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आवश्यक विधेयक एकमतानं मंजूर केलं आहे. 

आतापर्यंत आंध्र प्रदेश लोकसेवा आयोग कायद्यानुसार केवळ राज्य लोकसेवा आयोग, निवड समिती किंवा एम्प्लॉयमेन्ट एक्स्चेंजद्वारेच सरकारी सेवेत अधिकारी, कर्मचा-याची नियुक्ती होत असे.

त्यामुळेच आंध्र प्रदेश मंत्रिमंडळानं ठराव करुनही, गतवर्षीच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूची आतापर्यंत सरकारी सेवेत नियुक्ती होऊ शकली नव्हती.