मुंबई : रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला एक खेळाडू ते ब्रँड धोनी... हा धोनीचा क्रिकेट करिअरमधला प्रवास थक्क करणारा आहे.
धोनी नावाचा एक झंझावात टीम इंडियामध्ये आला आणि तेव्हापासून टीम इंडियाला जिंकण्याची सवयच झाली. तसा टीम इंडियाचा दबदबा जगभरात होताच. पण धोनीच्या हातात नेतृत्व गेल्यापासून इतर टीम्स जरा वचकूनच खेळायला लागल्या.
रांची ते टीम इंडियाचा कॅप्टन
धोनीची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली त्यावेळी टीम इंडियामध्ये भलेभले सुपरस्टार्स होते... त्यांच्या पंक्तीत झारखंडमधल्या रांचीतल्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या धोनीनं साऱ्या जगाला त्याची दखल घ्यायला भाग पाडलं. पाहता पाहता धोनी साऱ्यांना मागे टाकून पुढे गेला आणि टीम इंडियाच्या कॅप्टनशिपची धुरा समर्थपणे पेलली.
टीम इंडियाला जिंकायची सवय
धोनी टीम इंडियाचा कॅप्टन झाला आणि टीम इंडियाला जिंकायची सवय लागली. टी ट्वेंटीचा पहिला वर्ल्डकप धोनीनं जिंकला आणि धोनीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला
वैयक्तिक खेळासह उत्कृष्ट नेतृत्व
धोनी खेळला की इंडिया जिंकणार... पण धोनी ढेपाळला तर इंडियाचं काही खरं नाही, हे समीकरण झालं. टीमसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती झाल्यावर धोनीची बॅट तळपलीच म्हणून समजा. धोनीनं वैयक्तिक खेळाचा स्कोअरबोर्ड हलता ठेवलाच. पण त्याचबरोबर धोनीच्या बॅटनं अनेक वेळा टीम हरतानाही विजय खेचून आणला. धोनीनं कधीच मागे बसून प्रोत्साहन देत नेतृत्व केलं नाही, तर कायम फ्रंटवर येऊन आक्रमक होत टीम इंडियाचं नेतृत्व केलं.
उत्कृष्ट कॅप्टन
कॅप्टनंच्या नेतृत्वाखाली किची मॅचेस जिंकल्या, हे सरसकट नेतृत्व किती यशस्वी ते ठरवण्याचं माप... पण, कॅप्टन्सी चांगली असली तरच प्रत्येक खेळाडूचा खेळ बहरतो... टीम इंडियाच्या खेळाडूंच्या पाठीवर धोनीचा कायम हात असायचा. कुणाकडून काय काढून घ्यायचं, हे धोनीला अचूक समजायचं. २०१३ वर्ल्डकपच्या फायनलची फायनल ओव्हर त्यानं इशांत शर्माच्या हातात दिली होती... तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता... पण धोनीचा अंदाज अचूक ठरला.
तरुणांशी उत्तम कनेक्ट...
धोनी टीम इंडियात आला त्यावेळी सचिनसारखे दिग्गज प्लेअर्सही होते... त्याहीवेळी सीनिअर्सच्या दडपणाखाली न येता, त्यानं टीमला तरुण चेहरा दिला. तरुण प्लेअर्सवर विश्वास ठेवला आणि नव्या खेळाडूंनी तो सार्थही ठरवला.
कॅप्टन कूल...
कॅप्टननं कसं कूल असावं, याचं उदाहरण धोनी... टीम इंडियाच्या बॅडपॅचमध्येही तो कधी चिडला नाही... धोनीवर प्रचंड टीका झाली, त्याचं करिअर संपल्याच्या आवया अनेक वेळा उठवल्या गेल्या. पण, धोनीनं कधीच वाचाळपणानं त्याला उत्तर दिलं नाही. उलट वैयक्तिक खेळी आणि उत्कृष्ट कॅप्टनसी करतच टीकाकारांना फोर सिक्स लगावत त्यांची तोंड गप्प केली.
ब्रँड धोनी
रांचीसारख्या छोट्याशा खेड्यातून आलेला एक सामान्य खेळाडू ते टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन हा धोनीचा प्रवास थक्क करणारा आहे. धोनीच्या याच सगळ्या गुणांमुळे तो फक्त एक खेळाडू किंवा कॅप्टनच नाही तर तो सक्सेसफुल ब्रँड बनला... मॅनेजमेंटसाठी उत्तम केसस्टडी ठरला... असा ब्रँड ज्यानं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू तर जपलीच... पण इतरांनाही त्याच्यासारखं होण्याची ताकद दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.