वर्ल्डकपपर्यंत टीम इंडियासोबतच राहणार रवी शास्त्री

माजी कर्णधार रवी शास्त्री हा आयसीसी वर्ल्ड कप २०१५ पर्यंत भारतीय क्रिकेट टीमच्या संचालक पदी कायम असणार आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय टीमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Updated: Sep 28, 2014, 01:35 PM IST
वर्ल्डकपपर्यंत टीम इंडियासोबतच राहणार रवी शास्त्री title=

चेन्नई : माजी कर्णधार रवी शास्त्री हा आयसीसी वर्ल्ड कप २०१५ पर्यंत भारतीय क्रिकेट टीमच्या संचालक पदी कायम असणार आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय टीमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शास्त्रीबरोबर डंकन फ्लेचर, आर श्रीधर, संजय बांगड आणि भरत अरुण हे टीमसोबत रहणार आहे. २०१५ बीसीसी वर्ल्ड कपपर्यंत हे सर्वजण सहयोगी स्टाफ म्हणून कायम राहतील.

इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर रवी शास्त्री यांना टीमच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर भारताने वनडे सीरिजमध्ये विजयी मिळवला. त्यानंतर आता बीसीसीआयने वर्ल्डकपपर्यंत शास्त्री यांनाच या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

बीसीसीआय दरवर्षी २० नोव्हेंबरला बैठक होते असते. पण, यावेळी बीसीसीआयने हा निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये घेतला.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.