जेव्हा रवींद्र जडेजा ढसाढसा रडला

भारतीय क्रिकेट टीमचा अष्‍टपैलू रवींद्र जडेजाने आपल्‍या आईचे तर्पण केले. जडेजाची आई लताबेन या 2005 साली एका दुर्घटनेत मृत पावल्या होत्या.

Updated: Jul 17, 2014, 06:56 AM IST
जेव्हा रवींद्र जडेजा ढसाढसा रडला title=

सिद्धपूर : भारतीय क्रिकेट टीमचा अष्‍टपैलू रवींद्र जडेजाने आपल्‍या आईचे तर्पण केले. जडेजाची आई लताबेन या 2005 साली एका दुर्घटनेत मृत पावल्या होत्या.

रवींद्र जडेजाने शनिवारी आईचं तर्पण केलं, तेव्हा त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. गुजरातमधील सिद्धपूरमध्ये शनिवारी रवींद्र जडेजा आईच्या आठवणीत रडला.

यावेळी जडेजा तो म्‍हणाला, 'मी एक चांगला क्रिकेटपटू बनावा, अशी आईची इच्‍छा होती. तसेच मी देशाकडून खेळताना तिला पाहायचे होते.' आईची हे वाक्‍य आठवताच त्‍याला अश्रू अनावर झाले.

सर रवींद्र जडेजानं गुपचूप केला साखरपुडा
टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर ऑफिशिअली एंगेज झालाय. सर रवींद्र जडेजानं साखरपुडा केलाय. या बातमीमुळं त्याच्या तमाम महिला चाहत्यांचा हिरमोड होईल.

चेतना नावाच्या या मैत्रिणीबरोबर जडेजाचा साखरपुडा झालाय. काही दिवसांपूर्वी जडेजा जयपूरमध्‍ये एका अनोळखी मुलीबरोबर टीम बसमध्‍ये आढळला होता. ती मुलगी म्हणजेच चेतना... 

मिळालेल्या माहितीनुसार ती त्‍याची नियोजित वधू चेतना आहे. जडेजाला वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या मालिकेसाठी विश्रांती देण्‍यात आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्‍या दौऱ्यासाठी उपलब्‍ध असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.