२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी

मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.

Updated: Apr 20, 2016, 03:48 PM IST
२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी title=

मुंबई : मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.

सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीरचं कौतूक करत म्हटलं की, 'गंभीर आजही भारतीय टीममध्ये परत आपलं स्थान कायम करु शकतो. ज्याप्रकारे गंभीर खेळतोय ते पाहून खूपच छान वाटतंय.' तर कॉमेंटेटर आकाश चोपडाने ही ट्विट करत 'उथप्पाला आता  टीम इंडियाच्या टी-20 संघात घेतलं पाहिजे, काय तुम्ही याच्याशी सहमत आहात का? असं म्हटलं आहे.

गौतम गंभीर यंदाच्या आयपीएलमध्ये २२६ रन करत टॉपवर आहे. उथप्पाने या आयपीएलमध्ये ४ सामन्यांमध्ये १३४ रन्स केले आहे. पंजाब विरोधात ही दोघांनी चांगली सुरुवात करुन देत हा सहज विजय मिळवला. उथप्पाने आतापर्यंत ३ वेळा १९, २२ आणि २४ बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे आता या दोघांना संधी मिळतेय का हे पाहावं लागेल.