रोहित शर्माचे तीन महिन्यानंतर पुनरागमन

मांडीच्या दुखापतीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मैदानाबाहेर असेलला भारताचा धडाकेबाज रोहित शर्मा विजय हजारे चषक स्पर्धेतून पुनरागमन करतोय

Updated: Mar 2, 2017, 10:27 AM IST
रोहित शर्माचे तीन महिन्यानंतर पुनरागमन title=

मुंबई : मांडीच्या दुखापतीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मैदानाबाहेर असेलला भारताचा धडाकेबाज रोहित शर्मा विजय हजारे चषक स्पर्धेतून पुनरागमन करतोय

मुंबईच्या दोन अखेरच्या सामन्यात सहभागी होणार असल्याचे रोहितने बुधवारी सांगितले. रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे गेले तीन महिने तो संघात खेळू शकलेला नाही. 

रोहितने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. आता मी पूर्णपणे ठीक आहे. विजय हजारे चषक स्पर्धेत ४ आणि ६ मार्चला होणाऱ्या सामन्यात खेळेन. येथे पोहोचण्यासाठी मदत केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो, असे रोहित ट्विटरवर म्हणाला. 

रोहितला इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० तसेच बांगलादेशविरुद्धच्या एका कसोटी सामन्याला दुखापतीमुळे मुकावे लागले होते.