सचिननं दत्तक घेतलं आंध्रप्रदेशातील गाव!

माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडूलकरनं आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर. कांडरिगा हे गाव आदर्श ग्राम योजनं अंतर्गत दत्तक घेतलंय. 

Updated: Nov 16, 2014, 10:41 AM IST
सचिननं दत्तक घेतलं आंध्रप्रदेशातील गाव! title=

मुंबई: माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडूलकरनं आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर. कांडरिगा हे गाव आदर्श ग्राम योजनं अंतर्गत दत्तक घेतलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी अलिकडेच सांसद आदर्श ग्राम योजना जाहीर केलीये. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करणं अपेक्षित आहे. त्याच धर्तीवर सचिननं हे गाव दत्तक घेतलं असून गावाच्या विकासासाठी सचिन तीन कोटींचा निधी वापरणार आहे. 

इथल्या विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी सचिन आज या गावाला भेट देणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.