१४ वर्षानंतर सचिनने सांगितलं, आपण २००३ चा वर्ल्डकप का हरलो?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १४ वर्षानंतर सांगितलं की, २००३ च्या विश्व चषकात टीम इंडियाचा पराभव का झाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 24, 2017, 03:48 PM IST
१४ वर्षानंतर सचिनने सांगितलं, आपण २००३ चा वर्ल्डकप का हरलो? title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १४ वर्षानंतर सांगितलं की, २००३ च्या विश्व चषकात टीम इंडियाचा पराभव का झाला. सचिन : ए बिलियन ड्रीम्स या सिनेमाच्या निमित्ताने बोलत होता, त्यावेळी त्याने हे बाब उघड केली. टी २० आल्यानंतर बॅटसमनच्या खेळात बदल आला, जर २००३ च्या विश्वचषकात असं झालं असतं, तर भारताला मोठी मदत झाली असती.

टीम इंडियाला २००३ च्या विश्व चषकात ऑस्ट्रेलियाने १२५ रन्सने हरवलं होतं. ऑस्ट्रेलियाने २ विकेट आणि ३५९ रन्स बनवले होते, मात्र टीम इंडिया २३४ रन्सवर आऊट झाली होती.

सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला, 'मला वाटतं जर आपण हा सामना आज खेळलो असतो, तर तो वेगळ्या पद्धतीने खेळलो असतो, त्या सामन्यात आम्हाला खूप उत्साह होता , अगदी पहिल्या ओव्हरपासून आज दृष्टीकोन वेगळा होता. तेव्हा ३५९ धावा खूप जास्त वाटायच्या, मात्र आता काही जास्त वाटत नाहीत.