म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली!

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरनं निवृत्ती घेण्याच्या कारणाचा पहिल्यांदाच उलगडा केला आहे.

Updated: Mar 3, 2017, 10:19 PM IST
म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली! title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरनं निवृत्ती घेण्याच्या कारणाचा पहिल्यांदाच उलगडा केला आहे. ऑक्टोबर २०१३मध्ये झालेल्या चॅम्पियन्स लीगवेळी दिल्लीतल्या मॅचआधी माझ्या मनात निवृत्तीचा विचार आल्याचं सचिन म्हणाला.

माझ्या कारकिर्दीतली प्रत्येक दिवसाची सुरुवात जिममध्ये व्यायामानं व्हायची, पण त्या दिवशी सकाळी मला उठण्याचा कंटाळा आला. याच वेळी निवृत्ती घेण्याचा विचार मी केल्याचं सचिन म्हणाला आहे.

लिंक्डइन या वेबसाईटबरोबर सचिननं करार केला आहे. या वेबसाईटवर सचिनचा 'माय सेकंड इनिंग' हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी सचिनवर दबाव टाकण्यात आला, अशा चर्चा होत्या. पण या सगळ्या चर्चांना आता खुद्द सचिननंच पूर्णविराम दिला आहे.