नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सचे कोच आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अकरम यांनी नुकतीच मुंबईत मास्टर ब्लास्टरच्या सचिन तेंडुलकरच्या छोट्या मास्टरची म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची भेट घेतली.
एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना अकरमनं अर्जुनचीही तोंड भरून स्तुती केलीय. अर्जुनविषयी बोलताना वसीम अकरम यांनी अर्जुन तेंडुलकरचा उल्लेख 'ध्येयवेडा मुलगा' म्हणून केलाय.
अर्जुननं आपल्याकडून डाया हातानं स्विंग बॉलिंग करण्याचे धडेही घेतल्याचं त्यानं म्हटलंय. 'मी त्याला बॉलिंग करताना मनगटाच्या स्थितीबद्दल काही सामान्य गोष्टी सांगितल्या. जर तू डाव्या हातानं बॉलिंग करत असशील आणि अशा वेळी तुझ्यासमोर डाव्या हाताचा बॅटसमन खेळतोय तर त्यासाठी कशा पद्धतीनं बॉलला आतल्या बाजुला वळवता येऊ शकतं, हेही मी त्याला सांगितलंय.
इतकचं नाही तर अर्जुननं तीन महिने अभ्यास केल्यानंतर... डाव्या हाताच्या बॅटसमनसमोर आउट स्विंग कसं करता येईल, याचे धडे देण्याचंही आश्वासन अकरमनं त्याला दिलंय.
मुंबईमध्ये आयपीएल मॅच दरम्यान सचिन स्वत: अर्जुनला बॉलिंगच्या टीप्स घेण्यासाठी वसीम अकरमकडे घेऊन गेला होता.
अर्जुन सचिन तेंडुलकर स्वत: डाव्या हाताचा खेळाडू आहे तर वसीम अकरमही खेळताना आपल्या डाव्या हातानंच खेळून समोरच्या बॅटसमनची धांदल उडवून द्यायचा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.