VIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी 'चीटिंग'

जगभरात क्रिकेट हा खेळ सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र हा व्हिडीओ पाहून खरंच सभ्य लोकांचा खेळ आहे की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

Updated: Apr 7, 2016, 11:18 AM IST
VIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी 'चीटिंग' title=

मुंबई : जगभरात क्रिकेट हा खेळ सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र हा व्हिडीओ पाहून खरंच सभ्य लोकांचा खेळ आहे की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूने असे  कृत्य केले ज्यामुळे संपूर्ण संघाला शरमेने मान खाली घालावी लागली. 

हा वनडे सामना एमसीजी मैदानावर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने मारलेला शॉट वेस्ट इंडिजचा गोलंदाज रोजर हार्परने पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातून कॅच निसटला. मात्र हार्परने फसवणुकीने असे दाखवले की कॅच घेतला होता. मात्र बॉलचा स्पर्श जमिनीला झाला होता. 

अंपायर्सनी आपापसात चर्चा केल्यानंतर वेस्ट इंडिजची बादची मागणी फेटाळून लावली. रिप्लेमध्येही स्पष्ट दिसत होते की फलंदाज बाद नाहीये आणि रोजरच्या हातातून बॉल निसटला होता. या सामन्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी हार्परवर जोरदार टीका केली.