टी-२० वर्ल्डकपबाबत सेहवागची भविष्यवाणी

टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये असतील अशी शक्यता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलीये. 

Updated: Mar 7, 2016, 04:49 PM IST
टी-२० वर्ल्डकपबाबत सेहवागची भविष्यवाणी title=

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये असतील अशी शक्यता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलीये. 

भारताव्यतिरिक्त त्या गटातून मी न्यूझीलंडची निवड करेन. दुसऱ्या गटातून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघावर नजरा असतील. २००७ ची पुनरावृत्ती करण्यास भारत सज्ज झालाय. यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारत प्रबळ दावेदार आहे. सध्या टीम इंडिया चांगला खेळ करतेय, असे सेहवाग म्हणाला. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भारताचा पाकिस्तानवर दबदबा राहण्याबाबत सेहवागला विचारले असता, कोणतेही एक कारण सांगता येणार नाही. मात्र मी इतके सांगू शकतो की भारताचा खेळ पाकिस्तानच्या तुलनेत चांगला होतोय.