दुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार...

वीरेंद्र सेहवागच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी तेज बॉलर शोएब अख्तरनं टीका केलीय. 

Updated: Mar 9, 2016, 12:54 PM IST
दुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार... title=

नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवागच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी तेज बॉलर शोएब अख्तरनं टीका केलीय. 

नुकतंच काही दिवसांपूर्वी, क्रिकेट वीरेंद्र सेहवागनं शोएब अख्तरवर टीका करत 'तो पैशांसाठी भारतीय खेळाडुंचं कौतुक करतो' असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावर आता शोएबनं ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. 

'सहवागसारख्या महान खेळाडूचं हे अपरिपक्व वक्तव्य' असं शोएबनं ट्विट केलं होतं. त्यानंतर मात्र त्यानं हे ट्विट डिलीट करून टाकलं. 

 

नेमकं काय म्हटलं होतं सेहवागनं...

शोएब अख्तर माझा चांगला मित्र आहे. त्याची भारतात आपला व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे. तो भारताचं कौतुक करतो, कारण यामुळे त्याला कमेंट्रीसाठी चांगले पैसे मिळतील. तुम्ही जेव्हाही टीम इंडियाची कमेंट्री शोएब अख्तरकडून ऐकाल तेव्हा नोटीस कराल की तो भारताचं कौतुकचं करत असतो, असं सेहवागनं म्हटलं होतं.