आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी शोएबचा 'निकाह'

Updated: Jun 26, 2014, 10:26 AM IST
आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी शोएबचा 'निकाह' title=

 

कराची : पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज शोएब अख्तर आता एका नव्या वादात अडकलाय. 38 वर्षांच्या शोएबनं एका 20 वर्षीय तरुणीशी विवाह केल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

शोएबनं पख्तूनखवा प्रांतातील हरिपूर भागात राहणाऱ्या एका तरुणीशी निकाह केल्याचं एका टीव्ही चॅनल रिपोर्टमध्ये म्हटलंय. हरिपूरमध्येच हा निकाह बुधवारी पार पडल्याचं सांगण्यात येतंय.  

संबंधित टीव्ही चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, हक मेहरची पाच लाख रुपये रक्कमही दिली गेलीय. या निकाहासाठी शोएबचे आई-वडिलही उपस्थित होते. अख्तरनं अगोदर या बातम्यांचं खंडन करत, आपण आपल्या आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं.

शोएबच्या जवळच्या सूत्रांनीदेखील या बातमीला दुजोरा दिलाय. शोएब आणि त्याचं संपूर्ण कुटुंब 12 जून रोजी मुलीच्या घरी गेलं होतं आणि इथंच दोन्ही कुटुंबीयांनी मिळून निकाहाची तारिख ठरवली, असं सूत्रांकडून कळतंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.