प्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Updated: Apr 4, 2015, 08:37 AM IST
प्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती title=

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

नवी दिल्लीतील हॉटेल लीला पॅलेजमध्ये आयोजित विवाहसोहळ्यात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीसह उपस्थित होता. तसंच आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन, चेन्नई सुपरकिंग्जचे खेळाडू ड्रवेन ब्रेव्हो, मायकल हसी आणि कोट स्टीफन फ्लेमिंगनंही लग्नाला हजेरी लावली. विराट आणि अनुष्काही लग्नाला उपस्थित होते. 

राजकारणातील व्यक्तींमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव लग्नसमारंभाला हजर होते. 

प्रियंका चौधरी नेदरलँडमध्ये एका बँकेत नोकरी करत होती, रैनाची बालमैत्रिण असल्याचं सांगण्यात येतंय. रैना ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप खेळून नुकताच मायदेशी परतला आणि आयपीएलच्या आठव्या सिझनचीही सुरूवात होतेय. त्यापूर्वीच हे लग्न झालंय. रैना चेन्नई सुपरकिंग्जचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.