विराट कोहलीची यशस्वी गाथा, १० 'दमदार' पावलं

टीम इंडियाचा वन-डे कप्तान विराट कोहलीची सध्या जोरदार चर्चा आहे. टीम इंडियासाठी सुरु असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो कसा तारणहार ठरलाय याची. त्यानंतर तो कसा गुणी आणि चांगला खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना विराट दर्शन पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला. मात्र, विराटची यशस्वी गाथा तुम्हाला माहित आहे का? त्याची १० कारणे...

Updated: Mar 30, 2016, 11:31 AM IST
विराट कोहलीची यशस्वी गाथा, १० 'दमदार' पावलं title=

मुंबई : टीम इंडियाचा वन-डे कप्तान विराट कोहलीची सध्या जोरदार चर्चा आहे. टीम इंडियासाठी सुरु असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो कसा तारणहार ठरलाय याची. त्यानंतर तो कसा गुणी आणि चांगला खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना विराट दर्शन पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला. मात्र, विराटची यशस्वी गाथा तुम्हाला माहित आहे का? त्याची १० कारणे...

१. गल्लीपासून क्रिकेटला सुरुवात
विराट कोहलीचा जन्म पंजाब कुटुंबातील. लहानपणापासून तो क्रिकेट खेळत होता. गल्लीपासून क्रिकेटला खरी सुरुवात झाली. दक्षिण दिल्ली क्रिकेट अकादमी स्थापन झाली त्यावेळी विराट ९ वर्षांचा होता. तेव्हापासून त्याने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचे वडील प्रेम कोहली यांनी विराटला क्रिकेटसाठी नेहमी पाठिंबा दिला.

२. अंडर-१५ टीममध्ये संधी मिळाली
पॉली उमरीगर ट्रॉफीसाठी ऑक्टोबर २००२मध्ये विराटला अंडर-१५मधून दिल्ली संघातून स्थान मिळाले. या चषकात दिल्लीकडून खेळताना सर्वाधिक रन्स केलेत. त्यांने ३४.४० च्या सरासरीने १७२ रन्स ठोकलेत. त्यानंतर २००३-२००४मध्ये दिल्ली संघाचा कर्णधार झाला. कर्णधार झाल्यानंतर त्याने ७८च्या गतीने ३९० रन्स केलेत. त्यानंतर अंडर-१७ टीम दिल्लीकडून विराट खेळला.

३. अंडर-१९ टीम इंडियात खेळण्याची संधी
२००६ मध्ये विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यासाठी अंडर-१९ टीम इंडियातून खेळण्यासाठी कॉल आले. कोहलीने तीन वन-डेत १०५ सरासरीने आणि तीन कसोटी सामन्यात ४९च्या सरासरीने रन्स बनविलेत. अंडर-१९ टीम इंडियाने दोन्ही मालिका जिंकल्यात.

४. वडिलांचे छत्र हरपले आणि विराटने क्रिकेटला वाहून घेतले
डिसेंबर २००६मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला दिल्लीकडून त्याला कर्नाटकविरुद्ध खेळायचे होते. विराटने या सामन्यात ९० रन्स करत महत्वाची भूमिका बजावली. आऊट झाल्यानंतर तो थेट वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी सहभागी झाला. त्यावेळी दिल्लीचा कर्णधार मिथून मन्हासने म्हटले, ही क्रिकेटमध्ये मोठी कमिटमेंट आहे. त्याच्या या निर्णयाला माझा सलाम.

५. अंडर-१९ वर्ल्ड कपचा कर्णधार
२००८मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कपचा विराट कर्णधार झाला. आपल्या कौशल्यावर त्याने टीम इंडियाला चॅम्पियन बनविले. चार क्रमांकावर खेळताना त्याने ६ सामन्यात ४७च्या सरासरीने २३५ रन्स केल्यात.

६. आयपीएलमध्ये रॉयल बोली
अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये खेळताना विराट कोहलीने चमक दाखवली. त्याची ही कामगिरी पाहून त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने त्याला खरेदी केला. ३० हजार डॉलरमध्ये त्याचा लिलाव झाला.

७. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी त्याला आला कॉल
ऑगस्ट २००८मध्ये विराट कोहली श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून खेळण्यासाठी कॉल आला. तसेच पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूत त्याच्या नावाचा समावेश झाला. विराटसाठी हे सरप्राईज होते. श्रीलंकेबरोबर खेळताना १२ रन्सवर विराट रनआऊट झाला. या मालिकेत ४ सामन्यात विराटने पहिले आपले अर्धशतक झळकावले. या ५० रन्स टीम इंडियाच्या विजयाचा वाटा झाल्यात. भारताने ३-२ने मालिका जिंकली. विराटने ३७, २५ आणि ३१ रन्स केल्यात.

८. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता
नोव्हेंबर २००८मध्ये विराट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. मात्र, खेळण्यास संधी मिळाली नाही. डिसेंबर २००८मध्ये बीसीसीआयकडून ग्रेड-डीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. जानेवाली २००९मध्ये श्रीलंकाविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेसाठी विराटला स्थान मिळाले नाही.

९. स्पेशल खेळाडू म्हणून संधी मिळाली
ऑगस्ट २००९मध्ये विराटला स्पेशल खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यातआले. त्याने आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांनाच चकित केले. ७ सामन्यात त्यांने ३९८ रन्स केल्यात. वर्ल्ड क्लास बॉलिंगसमोर जोरदार प्रदर्शन केले.

१०. गंभीर, युवी दुखापतीमुळे विराटला संधी
श्रीलंका विरुद्ध ट्राय सीरीजमध्ये गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांना दुखापत झाली. त्यामुळे विराटला खेळविण्याच निर्णय झाला. त्यांने वेस्टइंडीज विरुद्ध ७९ रन्स करत मॅन ऑफ द मॅचच्या किताब पटकावला. डिसेंबर २००९मध्ये श्रीलंकेविरोधात मायदेशात युवराज जखमी झाल्याने संधी मिळाली आणि विराटने शतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक. या सामन्यात गौतम गंभीरने १५० रन्स केलेत. त्याला मॅन ऑफ द मॅन किताब दिला गेला. मात्र, तो त्याने विराटला प्रदान केला.