बांग्लदेशच्या तमिम इक्बालचा विक्रम

आयसीसी वर्ल्ड टी-20च्या ओमान विरुद्धच्या मॅचमध्ये बांग्लादेशच्या तमिम इक्बालनं विक्रम केला आहे. 

Updated: Mar 13, 2016, 11:26 PM IST
बांग्लदेशच्या तमिम इक्बालचा विक्रम title=

धर्मशाला: आयसीसी वर्ल्ड टी-20च्या ओमान विरुद्धच्या मॅचमध्ये बांग्लादेशच्या तमिम इक्बालनं विक्रम केला आहे. या मॅचमध्ये तमिमनं शानदार सेंच्युरी झळकावली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकवणारा तमिम हा पहिला बांग्लादेशचा खेळाडू ठरला आहे. याबरोबरच टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये सेंच्युरी मारण्याचा विक्रमही आता तमिमच्या नावावर झाला आहे. 

तमिम इक्बालनं 63 बॉलमध्ये नाबाद 103 रन बनवले. तमिमच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तमिमच्या या अफलातून खेळीमुळे बांग्लादेशला 180 रनपर्यंत मजल मारता आली.