ऑकलंड : पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारण्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे अभिनंदन केले आहे तर दक्षिण आफ्रिकेला धीर दिला आहे. आज चार विकेट न्यूझीलंडने आफ्रिकेचा पराभव केला.
न्यूझीलंडच्या संघाला ४३ ओव्हर्समध्ये डकवर्थ लुईसच्या आधारावर २९८ धावांचे टार्गेट होते. ग्रँड एलियट याने नाबाद ८४ धावांची खेळी करून एक चेंडू शिल्लक ठेऊन न्यूझीलंडला शानदार विजय मिळवून दिला.
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याबद्दल सचिन तेंडुलकरने ट्वीट करून न्यूझीलंडचे अभिनंदन केले आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेमी फायनलमध्ये कोणत्याही संघाला पराभूत होताना कोणत्याही संघाला चांगले वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेने चांगली कामगिरी केली असल्याचेही ट्वीटमध्ये म्हटले आहे.
माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही ट्वीट करून एलियटची प्रशंसा केली आहे. तो म्हणाला, एलियटने कमाल केली. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडला मोठे समर्थन होते. ते आपल्या सकारात्मकतेमुळे विजयाला पात्र आहेत. तसेच या दिग्गज फलंदाजाने आणखी एक ट्विट करून सांगितले की, यावेळी भाग्य दक्षिण आफ्रिकेसोबत नव्हते. तुम्ही पाहू शकतात की ते किती भावुक झाले होते. त्यांचे दुःख आम्ही जाणू शकतो. जिंकण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व झोकून दिले होते.
न्यूझीलंड फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी होणाऱ्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विजेत्याशी भिडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.