दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर

गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही. 

Updated: Oct 21, 2015, 10:24 AM IST
दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर  title=

नवी दिल्ली : गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही. 

सेहवाग भारतीय क्रिकेटमधील सर्वात महान सलामीवीर आणि मॅच विनर आहे. अशा प्रकारचा विचार करणारा आणि फलंदाजीची शैली असणारा खेळाडू पुन्हा होणे नाही. तो अपयशी होते होता तरी त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल केला नाही. स्पर्धात्मक क्रिकेटच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्याने आपल्या शैलीत बदल केला नसल्याचेही गौतम गंभीर म्हणाला...

पाहा नेमकं काय म्हणाला गौतम गंभीर आपल्या मुलाखतीत...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.