नागपूर कसोटीसह भारताने मालिका जिंकली

नागपूर कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशा फरकाने मालिका खिशात घातली. गेल्या नऊ वर्षात दक्षिण आफ्रिकेने परदेशात एकही मालिका गमावली नव्हती. भारताने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा मायदेशातील हा पहिला मालिका विजय आहे. 

Updated: Nov 27, 2015, 04:01 PM IST
नागपूर कसोटीसह भारताने मालिका जिंकली title=

नागपूर : नागपूर कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकत मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी मालिका खिशात घातलीये. गेल्या नऊ वर्षात दक्षिण आफ्रिकेने परदेशात एकही मालिका गमावली नव्हती. भारताने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा मायदेशातील हा पहिला मालिका विजय आहे. 

फिरकीपटूंसाठी अनुकूल असलेल्या नागपूरच्या जामठाच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन केले आणि तिसऱ्याच दिवशी कसोटीचा निकाल लागला. मोहालीचीच पुनरावृत्ती या कसोटीत पाहायला मिळाली. भारताचे अव्वल गोलंदाज आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी भेदक मारा करताना पाहुण्या फलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. अश्विनने दोन्ही डावांत मिळून तब्बल १२ विकेट घेतल्या. तर जडेजा (४) आणि अमित मिश्रा(४) यांनी त्याला चांगली साथ दिली.

कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा खेळ पाहता ही कसोटी गोलंदाज गाजवणार असल्याचे दाखवून दिले होते. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र तो आफ्रिकेच्या पथ्यावर पडला. भारताचा पहिला डाव अवघ्या २१५ धावांत पहिल्या दिवसांतच संपुष्टात आला. त्यानंतर आफ्रिका मोठी धावसंख्या करेल असे वाटत असतानाच अश्विन आणि जडेजाने आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणदाण उडवत त्यांना शंभरीही गाठू दिली नाही. 

पाहुण्यांचा पहिला डाव अवघ्या ७९ धावांत संपुष्टात आला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्येचे लक्ष्य ठेवले. मात्र हे लक्ष्य आफ्रिकेने पूर्ण होऊ दिले नाही. दुसऱ्या दिवशीच भारताचा दुसरा डावही १७३ धावांत संपला आणि आफ्रिकेसमोर विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान पाहता विजयाचे पारडे भारताच्या बाजूने झुकलेले होते. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर भारत सकाळीच डाव संपवेल असे वाटले होते. मात्र आफ्रिकेच्या हाशिम अमला आणि फाफ डु प्लेसिस यांनी खेळपट्टीवर तग धरताना पराभव काही काळ लांबवला. अमलाने ३९ तर प्लेसिसनेही ३९ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज झटपट बाद झाल्याने आफ्रिकेचा दुसरा डावही १८५ वर आटोपला आणि भारताने कसोटी जिंकली. या दौऱ्यात यापूर्वी आफ्रिकेने टी-२० आणि वनडे मालिकेत विजय मिळवला आहे. 

अश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड
अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.एका कॅलेंडर वर्षात सहा वेळा पाच विकेट घेण्याची किमया अश्विनने करून दाखवली आहे. त्याने अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे.

हरभजन अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होता. त्याने २००१मध्ये १२ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे याने २००४ मध्ये ही कामगिरी केली होती. त्याने एका इनिंगमध्ये ८ विकेट घ्याची कामगिरी केली होती. तर एका मॅचमध्ये १३ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. यासाठी त्याने १२ मॅच खेळल्या होत्या. अश्विनची ही कामगिरी सर्वार्थाने उत्कृष्ट मानली पाहिजे. त्याने ही कामगिरी केवळ ८ सामन्यात करून दाखवली आहे. त्याने बेस्ट कामगिरी ६६ धावा देऊन सात विकेट घेतल्या आहेत. अश्विनने १५ वेळा पाच विकेट घेतल्या आहे. ही कामगिरी त्याने भारतातील १८ टेस्टमध्ये केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.