बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. 

Updated: Mar 23, 2016, 12:34 PM IST
बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड title=

बंगळूरू : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. 

भारत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या या आहेत ६ शक्यता
१. टी-२०मध्ये भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ४ सामने झालेत. यात एकदाही भारत बांगलादेशकडून हरलेला नाही.
२. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवलाय.
३. या वर्ल्डकपमधील आतापर्यंतच्या दोन सामन्यात भारताचा एक विजय तर एक पराभव झालाय. तर दुसरीकडे बांगलादेशला आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागलेय.
४. सुपर-१०मधील दोन्ही सामन्यांत यजमान भारताने विजय मिळवल्यास सेमीफायनलमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.
५. सलग दोन सामन्यांतील पराभवामुळे बांगलादेश याआधीच स्पर्धेबाहेर गेलीये. 
६. भारतापूर्वीच्या सामन्याआधी बांगलादेशला संघाला मोठा धक्का बसलाय तो म्हणजे तस्कीन अहमद आणि आफरत सनी या दोघांचे आयसीसीकडून निलंबन करण्यात आलेय.