वेलिंग्टन : पैशानं सर्व काही विकत घेता येतात आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं जेव्हा भारताचा एक मोठा समर्थक 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकवा यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवताना दिसला.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये जन्मलेल्या २४ वर्षीय अरुण भारद्वाज याला वर्ल्डकप मात्र न्यूझीलंडनं जिंकावा, असं वाटतंय.
यामागे, कारण म्हणजे अरुणनं भारत आणि झिम्बॉम्वे दरम्यान वर्ल्डकपच्या 'पूल बी' मॅच दरम्यान शनिवारी ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये एका हातानं कॅच पडकला आणि अरुण 'टुई कॅच ए मिलियन'मध्ये असं करणारा सहावा व्यक्ती आहे. अरुण आता इतर पाच व्यक्तींसोबत ३,५०,००० न्यूझीलंड डॉलर (२,६०,००० अमेरिकन डॉलर) बक्षिसाची धनराशी वाटून घेणार आहे.
हीच धनराशी जर न्यूझीलंडनं क्वार्टर फायनल मॅच जिंकली तर पाच लाख, सेमीफायनल जिंकली तर ७,५०,००० आणि वर्ल्डकप जिंकला तर १० लाख न्यूझीलंड डॉलर होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या फॅन्सना टुई २०१५ 'टुई कॅच ए मिलियन' टीशर्ट घालून मैदानावर उपस्थित राहायचंय आणि एक साथ कॅचही पकडायचीय.
सात वर्षांपूर्वी भारताहून ऑकलंडला दाखल झालेल्या अरुणला या बक्षिसाच्या रक्कमेतून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय आणि त्यासाठी तो खूप उस्ताहीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.