अॅडलेड : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, द वॉल राहुल द्रविड, प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली यांना जमलं नाही, ते भारताचा मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीने करून दाखवले आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी खेळताना त्याने पहिल्या डावात शतक झळकविण्याची कामगिरी केली आहे.
विराटची ही कामगिरी माजी क्रिकेट कर्णधार विजय हजारे आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी करणारी ठरली आहे. हजारे आणि गावस्कर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.
जखमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जागेवर कर्णधारपदाची धुरा सांभाळताना त्याने कर्णधाराला साजेल असा खेळ केला. ऑस्ट्रेलियाच्या धावांच्या डोंगराला पार करताना भारताने तिसऱ्या दिवस अखेर पाच बाद ३६९ धावांपर्यंत मजल मारली आहे. हे शक्य झाले कर्णधार विराट कोहलीच्या ११५ धावांच्या खेळीमुळे. २६ वर्षांच्या या भारतीय खेळाडूचे कसोटी क्रिकेटमधील ७ वे शतक आहेत.
११५ धावांवर खेळत असताना मिचेल जॉन्सनच्या चेंडूवर विराटने रायन हॅरीसकडे झेल देऊन आपली शानदार इनिंग संपवली. सध्या कसोटीतील दोन दिवस शिल्लक आहेत आणि भारताचे वृध्दीमान साहा (१) आणि रोहित शर्मा ( ३३) धावांवर खेळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.