बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2014, 10:31 AM IST
बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...  title=

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

मिचेल जॉनसननं टाकलेला एक बाऊन्सर उसळून भारताचा कॅप्टन विराट कोहली याच्या हेल्मेटवर आदळला... आणि मैदानावर एकच शांतता पसरली.

तिसऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर म्हणून मुरली विजय आणि शिखर धवन मैदानात उतरले. शिखर धवननं २५ रन्स दिले. तर मुरली विजयनं आपली हाफ सेन्चुरी पूर्ण केली. ५३ रन्स ठोकल्यानंतर मिचेल जॉनसन याच्या एका बॉलवर मुरली विजय तंबूत परतला.

त्यानंतर, मैदानात उतरलेल्या कॅप्टन कोहलीनं चेतेश्वर पुजारासोबत चांगली सुरुवात केली. पण, अचानक जॉनसननं टाकलेला एक बाऊन्सर विराट कोहलीवर आदळला... आणि सगळ्यांनाच 'त्या' क्षणाची आठवण पुन्हा एकदा झाली. 

बॉल कोहलीच्या हेल्मेटवर येऊन आदळला... मैदानावर एकच शांतता पसरली... आणि सगळेच ऑस्ट्रेलियन खेळाडू विराटकडे धावले... त्यांनी विराटला सावरलं.

खुद्द बॉल फेकणारा जॉनसन यामुळे काही क्षण भांबावला... तसंच कॅप्टन क्लार्कनंही विराटकडे धाव घेतली... त्याच्या पाठिवर हात ठेऊन क्लार्कनं त्याला शांत केलं.   

ह्युजच्या धक्क्यातून पुरतं सावरायला या खेळाडूंना आणि क्रिकेटच्या चाहत्यांना अजून बराच वेळ लागणार आहे... पण, मैदानावरची ही एक छोटी घटना क्रिकेट चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.