ऋषभनेचा रेकॉर्ड अंडर १९ इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक

 विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने २४ चेंडूत ७८ धावा केल्याने भारताने आयसीसी १९ वर्ल्ड कपच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये नेपाळला सात विकेटने पराभूत करून लागोपाठ तिसरा विजय मिळविला आहे. भारताचा सामना क्वार्टर फायनलमध्ये नामिबिया किंवा बांगलादेशशी होऊ शकतो. 

Bollywood Life | Updated: Feb 1, 2016, 09:46 PM IST
ऋषभनेचा रेकॉर्ड अंडर १९ इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक  title=

मीरपूर :  विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने २४ चेंडूत ७८ धावा केल्याने भारताने आयसीसी १९ वर्ल्ड कपच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये नेपाळला सात विकेटने पराभूत करून लागोपाठ तिसरा विजय मिळविला आहे. भारताचा सामना क्वार्टर फायनलमध्ये नामिबिया किंवा बांगलादेशशी होऊ शकतो. 

डावखुरा फलंदाजज पंत याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार लगावले. त्याने अंडर १९ वर्ल्ड कप इतिहासात सर्वात जलद अर्धशतक बनविले आहे. भारताने विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य केवळ १८ ओव्हर्समध्ये पूर्ण केले. पंत याने आपले अर्धशतक केवळ १८ चेंडूत केले. 

टुर्नामेंटचा सरप्राइज पॅकेज असलेल्या ऋषभने कर्णधार ईशान किशन (५२) च्या साथीने १२४ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी अवेश खान याच्या नेतृत्वात गोलंदाजींनी नेपाळला आठ विकेटवर १६९ धावांवर रोखले. 

अवेशने ३४ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक डागर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.