सात वर्षाच्या मुलामध्ये दिसली सचिनच्या बॅटिंगची झलक

Updated: Jan 25, 2016, 01:22 PM IST

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जरी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या अप्रतिम खेळी अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहेत. प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने लगावलेले सुंदर फटके अविस्मरणीय असेच आहेत. त्यामुळे त्याची तुलना कोणीच करु शकत नाही.

मात्र सध्या एका मुलाचा क्रिकेट खेळतानाच व्हिडीओ चांगलाच शेअर होतोय. या मुलाची बॅटिंग पाहिल्यावर तुम्हाला सचिनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

गुजरातचा वसू हा अवघा सात वर्षांचा आहे. त्याची खेळण्याची पद्धत, फटके मारण्याचे कसब पाहता सचिनच्या फटकेबाजीची आठवण होते.