रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये जरी भारताला सुवर्णपदक मिळवता आले नसले तरी पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी कमाल केलीये.
उंच उडी प्रकारात भारताच्या मरियप्पन थांगावेलूनं सुवर्णपदक मिळवत नवा इतिहास रचलाय. भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवलंय.
पॅराऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताला मिळालेल हे तिसरं ऐतिहासिक सुवर्णपदक होय. याच प्रकारात भारताच्या वरुण सिंह भाटीनं कांस्यपदक पटकावलं.
थांगवेलू आणि भाटीच्या दैदीप्यमान यशामुळे रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा डौलानं फडकला. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असाच हा क्षण. या क्षणाचे आपल्याला सुख दिले ते थांगवेलू आणि भाटी या भारताच्या गुणवान खेळाडूंनी.