व्हिडिओ : तुम्ही महेंद्रसिंग धोनीला रांगताना पाहिलंय... इथे पाहा!

इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबियांसोबत निवांत वेळ व्यतीत करतोय.

Updated: Feb 15, 2017, 05:17 PM IST
व्हिडिओ : तुम्ही महेंद्रसिंग धोनीला रांगताना पाहिलंय... इथे पाहा! title=

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबियांसोबत निवांत वेळ व्यतीत करतोय.

यामध्ये, आपल्या लाडक्या चिमुकल्या झिवासोबत तो जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतोय... मग तिला खेळवणं असू दे किंवा तिच्यासोबत रांगणं...

असाच एका निवांत क्षणातला आपला एक व्हिडिओ माहीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. 
 

A post shared by @mahi7781 on

महेंद्रसिंग धोनी लवकरच इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) 2017 मध्ये दिसणार आहे.