मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील तिसऱ्या टेस्टमध्ये 3 दिवसात 40 विकेट पडल्यानंतर आयसीसीने नागपूर पिचबाबत टीका केली. पण आता विराट कोहलीनेही त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीने म्हटलं आहे की, 'पिचबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. अनेकांकडून त्यावर टीकाही होत आहे. पण एडिलेट टेस्ट ही अडीच दिवसामध्येच संपली होती. ज्यामध्ये भारतीय संघ 50 ते 100 रन्समध्येच तंबूत परतला होता. त्यावेळेस कोणी काही का म्हटलं नाही ?' असा प्रश्न कोहलीने उपस्थित केला आहे.
भारताने सिरिज 2-0 ने जिंकली आहे याबाबत कोणीच काही बोलत नाही. आमच्या विजयाबाबत काहीतरी सकारात्मक लिहा. सगळेच पिचवर टीका करत आहेत.
आयसीसीने नागपूर पिचला निकृष्ठ म्हटल्यानंतर त्यावरही विराटला प्रश्न विचारला गेला त्यावर विराटने प्रतिक्रिया देत म्हटलं की, आम्ही चांगलं खेळतोय. शेवटची टेस्टही आम्ही जिंकू. टीममध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.'
पुढची टेस्टही दिल्लीत होणार असून होमग्राऊंडवर भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली विजय मिळवून देण्याचं विराटसमोर पुढचं आव्हान असणार आहे. त्यासाठी दिल्लीकरही मोठे उत्सूक आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.