विराटने या दोघांना सांगितलं 'भारताचं नागरिकत्व घ्या'

आयपीएलमध्ये रन मशीन बनलेल्या विराट कोहलीचं सर्वत्र कौतूक होतंय. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. कोहली शिवाय त्याच्याच टीमच्या क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांनेही चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने दोघांचं कोतूक करतांना म्हटलं आहे की, दोघांनीही भारताचं नागरिकत्व घेतलं पाहिजे. गेल आणि एबी डिविलियर्स जर टीम इंडियामधून खेळले तर ही सौभाग्याची गोष्ट असेल.

Updated: May 23, 2016, 05:12 PM IST
विराटने या दोघांना सांगितलं 'भारताचं नागरिकत्व घ्या' title=

मुंबई : आयपीएलमध्ये रन मशीन बनलेल्या विराट कोहलीचं सर्वत्र कौतूक होतंय. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. कोहली शिवाय त्याच्याच टीमच्या क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांनेही चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने दोघांचं कोतूक करतांना म्हटलं आहे की, दोघांनीही भारताचं नागरिकत्व घेतलं पाहिजे. गेल आणि एबी डिविलियर्स जर टीम इंडियामधून खेळले तर ही सौभाग्याची गोष्ट असेल.

कोहलीने म्हटलं की, काही दिवसापूर्वी टीम ७ व्या स्थानावर होती ती आता दुसऱ्या स्थानावर आहे. हे सोपं नाही. प्रत्येक पुढची मॅच जिंकण्यासाठी मागचा स्कोर विसरावा लागतो. तुम्हाला तुमच्या फॉर्मचा घंमड येता कामा नये. अती आत्मविश्वास आणि आत्मविश्वास यामध्ये थोडाच फरक असतो हे ध्यानात असलं पाहिजे.

कोहलीने दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर गोलंदाजांचं कोतूक केलं. गोलंदाजांनी मेहनत केली. या पीचवर १६० पेक्षाही अधिक रन झाले असते पण गोलंदाजांनी त्यांना १५० रन्सवरच रोखलं. ज्यामुळे विजय मिळवता आला.