बंगळुरु: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली स्वस्तात आऊट झाला. या मॅचमध्ये कोहलीनं सात बॉलमध्ये सात रन बनवल्या. यंदाच्या वर्षामध्ये कोहली तूफान फॉर्ममध्ये आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून वर्ल्ड टी20 ते आयपीएलपर्यंत कोहलीनं खोऱ्यानं रन काढल्या आहेत. पण या मॅचमध्ये 7 रनवर आऊट होऊन विराटनं वेगळंच रेकॉर्ड तोडलं आहे. लागोपाठ 17 मॅच खेळल्यानंतर विराट कोहली अठराव्या मॅचमध्ये कोहली एकेरी धावसंख्येवर आऊट झाला आहे.
23 जानेवारी 2016 ला कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीमध्ये झालेल्या पाचव्या वनडेमध्ये आठ रनवर आऊट झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येच झालेल्या तीन टी 20 मग टी 20 वर्ल्ड कपमधल्या पाच मॅच आणि आयपीएलमधल्या नऊ मॅच अशा एकूण सलग 17 मॅचमध्ये प्रत्येक वेळी दोन आकडी रन्स केल्या होत्या.