नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट स्टार खेळाडू विराट कोहली 90 कोटी रुपये खर्च करुन जिम सुरु करणार आहे. तो जीम आणि फिटनेस केंद्र उभारणार आहे.
विराट कोहली सत्या सिन्हा याच्याबरोबर जीम आणि फिटनेसबाबत गुंतवणूक करणार आहे. ही गंतवणूक 90 कोटी रुपयांची आहे. तीन वर्षांत एकूण 75 सेंटर उभी करणार आहे, अशी माहिती सत्या सिन्हा याने दिली.
75 फिटनेसचा एकूण खर्च 190 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. कोहलीची ही जीम चिसेल ब्रॅन्ड नावाने ओळखली जाईल. कोहलीबरोबर चिसेल फिटनेस आणि सीएसईचा मालकी हक्क असेल. सीएसी कोहलीला मॅनेज करणारी संस्था कॉर्नरस्टोन स्पोर्टस् अॅण्ड एंटरटेनमेंटची सहाय्यक कंपनी आहे.
सत्या सिन्हा बंगळुरु येथे चिसेल फिटनेसचा संचालक आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जागेप्रमाणे जीम उभारणार आहोत. या जिममध्ये आंतरराष्ट्रीय विशेषतज्ज्ञ असण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याचे सत्या सिन्हा याने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.