सलग ४ मालिकांमध्ये ४ द्विशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबाद येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावले. 

Updated: Feb 10, 2017, 06:28 PM IST
सलग ४ मालिकांमध्ये ४ द्विशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज title=

हैदराबाद : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबाद येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावले. 

कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे चौथे द्विशतक आहे. तसचे सलग चार मालिकांमध्ये चौथ्यांदा द्विशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. विराटने यबाबतीत दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविडलाही मागे टाकले. 

पहिले द्विशतक त्याने जुलैमध्ये वेस्ट इंडिजमध्ये झळकावले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध, इंग्लंडविरुद्ध मुंबईत आणि आता हैदराबादमध्ये.