वीरेंद्र सेहवाग व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या जवानाबाबत म्हणाला....

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सीमेवरील भारतीय जवान, तेजबहादूरच्या व्हिडिओनंतर ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 10, 2017, 04:39 PM IST
वीरेंद्र सेहवाग व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या जवानाबाबत म्हणाला.... title=

नवी दिल्ली : क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सीमेवरील भारतीय जवान, तेजबहादूरच्या व्हिडिओनंतर ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. सेहवागनं ट्विटमध्ये #Food4Soldiers  असा हॅशटॅग करून म्हटलं आहे, 'आमच्या सैनिकांना आणि शेतकऱ्यांची देखभाल करणं गरजेचं आहे. खाण्याची योग्य व्यवस्था झाली पाहिजे'.
 
फेसबूकवर बीएसएफचा जवान तेजबहादूर यादवनं  एक व्हिडिओ पोस्ट केल्यानं मोठी खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने बड्या अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. तेजबहादूर यादवचा हा व्हिडिओ 70 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून 4 लाख जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सेहवागच्या आधी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील तेजबहादूरची पाठराखण केली आहे. शत्रुघ्न सिन्हानं ट्विटं केलं आहे. ‘सैनिकांची अवस्था पाहून मी खूपच दु:खी आहे. या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हायला हवी.