VIVO असेल IPL स्पॉन्सर, 'बदनामी'चं कारण देत PEPSI बाहेर

महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सी असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम ठेवण्यात आलीय. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Updated: Oct 18, 2015, 11:46 PM IST
VIVO असेल IPL स्पॉन्सर, 'बदनामी'चं कारण देत PEPSI बाहेर title=

मुंबई: महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सी असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम ठेवण्यात आलीय. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

दोन नवीन टीम खेळणार आयपीएल ९ आणि १०

त्यांच्या जागी आता दोन नवीन टीम्स आयपीएल-९मध्ये खेळणार आहे. याशिवाय आयपीएलचं मेनं टायटल स्पॉन्सर आता 'विवो' मोबाईल्स असतील. बीसीसीआयची पुढील मिटींग आता ९ नोव्हेंबरला आहे. 

आणखी वाचा - धोनी - विराट एकसाथ तो क्या हो बात...

दरम्यान, अजून चेन्नई आणि राजस्थानमधील खेळाडूंचं काय हे स्पष्ट झालेलं नाही. दोन वर्ष हे खेळाडू खेळणारच नाही की, त्यांचा पुन्हा लिलाव होईल, हे स्पष्ट व्हायचंय. 

पेप्सीच्या जागी विवो 

बीसीसीआयनं आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी विवो या चायनीज मोबाईल फोन कंपनीशी दोन वर्षांचा करार केला आहे. रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत बीसीसीआयच्या कार्यकारिणीनं हा निर्णय घेतला. त्यामुळे आयपीएलच्या नवव्या आणि दहाव्या पर्वात विवोला टायटल स्पॉन्सरशिप मिळणार आहे.

२०१३ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी पेप्सीको या शीतपेयांच्या कंपनीनं आयपीएलचा टायटल स्पॉन्सर म्हणून बीसीसीआयसोबत सुमारे ३९६ कोटी रुपयांचा करार केला होता. पण स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलची ढासळलेली प्रतिमा लक्षात घेऊन, पेप्सीकोनं काही दिवसांपूर्वीच या करारातून माघार घेतली होती.

आणखी वाचा - बीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.