सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २१९ रन्समध्ये खुर्दा

भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चहापानापर्यंत २१९ धावात खुर्दा केला. ४ मॅचच्या टेस्ट सिरीजपूर्वी भारतीय संघाला दोन  दोन दिवसीय सराव सामने खेळायचे आहेत. 

Updated: Nov 24, 2014, 06:26 PM IST
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २१९ रन्समध्ये खुर्दा title=

अॅडलेड : भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चहापानापर्यंत २१९ धावात खुर्दा केला. ४ मॅचच्या टेस्ट सिरीजपूर्वी भारतीय संघाला दोन  दोन दिवसीय सराव सामने खेळायचे आहेत. 

अॅडलेडमध्य खेळण्यात येणाऱ्या सामन्यात दिवसअखेर भारताने एक विकेटच्या बदल्यात ५५ धावा केल्या आहे. चांगली सुरूवात झाल्यानंतर शिखर धवन (१०) जोश लॉलोर याच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. 
यानंतर मुरली विजय (३२) आणि चेतेश्वर पुजारा (१३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९.४ षटकांत ३४ धावांची भागीदारी केली. 

भारताचे जलद गोलंदाज वरूण अरॉन याने तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमी, करन शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर आर अश्विनला एक विकेट विकेट मिळाली. 
ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने मॅथ्यू शॉर्टला शून्यावर बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी झाली. पण २१ षटकात वरूण अरॉनने ३ चेंडूत दोन विकेट घेऊन कांगारूंना झटके दिले. 

ओपनर रेयान कार्टर्स याने सर्वाधिक ५८ धावा बनविल्या. त्याला अश्विने बाद केले. आजच्या सामन्यात विकेट किपर रिद्धीमान साहा याने शानदार कामगिरी केली. यात पाच कॅच आणि एकाला स्टंपिंगने बाद केले. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.