हैदराबादची विजयी घोडदौड सुरूच, गुजरातचा उडवला धुव्वा

मागच्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या हैदराबादची यंदाच्या वर्षीही विजयी घोडदौड कायम आहे. 

Updated: Apr 9, 2017, 08:22 PM IST
हैदराबादची विजयी घोडदौड सुरूच, गुजरातचा उडवला धुव्वा  title=

हैदराबाद : मागच्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या हैदराबादची यंदाच्या वर्षीही विजयी घोडदौड कायम आहे. आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या दुसऱ्या मॅचमध्येही हैदराबादचा विजय झाला आहे. हैदराबादनं गुजरातला ९ विकेटनं हरवलं आहे.

विजयासाठीच्या १३६ रन्सचा पाठलाग हैदराबादनं फक्त १५.३ ओव्हरमध्ये केला. डेव्हिड वॉर्नरच्या ७६ रन्स आणि मोसेस हेन्रिक्सच्या ५२ रन्समुळे हैदराबादचा विजय सोपा झाला.

याआधी टॉस जिंकून हैदराबादनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि गुजरातला २० ओव्हरमध्ये १३५/७ वर रोखलं. अफगाणिस्तानच्या राशिद खाननं या मॅचमध्ये सर्वोत्तम बॉलिंग करत गुजरातच्या तीन विकेट घेतल्या. राशिद खानलाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

दोन मॅचमध्ये दोन्ही विजय मिळवल्यामुळे हैदराबाद ४ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरातला मात्र त्यांच्या दोन्ही मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.