'तर भारताचा पराभव निश्चित'

भारत आणि बांग्लादेशमध्ये रविवारी आशिया कपची फायनल होणार आहे.

Updated: Mar 4, 2016, 08:54 PM IST
'तर भारताचा पराभव निश्चित' title=

मीरपूर: भारत आणि बांग्लादेशमध्ये रविवारी आशिया कपची फायनल होणार आहे. या मॅचमध्ये आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणे खेळलो तर विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया बांग्लादेशचा बॅट्समन तमिम इक्बाल यानं दिली आहे. 

मागच्याच वर्षी आम्ही 50 ओव्हरच्या मॅचमध्ये भारताचा पराभव केला होता. त्यामुळे आता टी-20मध्येही त्यांचा पराभव करणं शक्य आहे. असं तमिम म्हणाला आहे.

रविवारी होणाऱ्या या मॅचसाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. भारताच्या प्रत्येक खेळाडूविषयी आम्ही टीम मीटिंगमध्ये बोललो आहे. अशी प्रतिक्रिया तमिम इक्बालनं दिली आहे.

2007 च्या वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशनं भारताचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. या मॅचमध्ये तमिम इक्बालनं महत्त्वाची कामगिरी बजावली होती.