बॉलिवूड प्रॉड्युसर आहे अमित मिश्रावर मारहाणीचा आरोप करणारी तरूणी

क्रिकेटर अमित मिश्रावर मारहाणीचे आरोप लावणारी तरूणी वंदना जैन एक बॉलिवूड चित्रपट प्रोड्युसर आहे. वंदना हिने २०१४ मध्ये आलेली कॉमेड़ी फिल्म 'बलविंदर सिंह फेमस हो गया' या चित्रपटाची सह निर्माता आहे. या चित्रपट गायक शान, मीका सिंह, अनुपम खेर आणि विंदू दारासिंह यांनी अभिनय केला आहे. वंदना सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये बंगाल टायगर्स टीमची सह मालकीण आहे. 

Updated: Oct 27, 2015, 08:21 PM IST
बॉलिवूड प्रॉड्युसर आहे अमित मिश्रावर मारहाणीचा आरोप करणारी तरूणी  title=

नवी दिल्ली : क्रिकेटर अमित मिश्रावर मारहाणीचे आरोप लावणारी तरूणी वंदना जैन एक बॉलिवूड चित्रपट प्रोड्युसर आहे. वंदना हिने २०१४ मध्ये आलेली कॉमेड़ी फिल्म 'बलविंदर सिंह फेमस हो गया' या चित्रपटाची सह निर्माता आहे. या चित्रपट गायक शान, मीका सिंह, अनुपम खेर आणि विंदू दारासिंह यांनी अभिनय केला आहे. वंदना सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये बंगाल टायगर्स टीमची सह मालकीण आहे. 

'बेंगळुरू मिररने दिलेल्या माहितीनुसार जैन हिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मिश्रा गेल्या तीन वर्षांपासून वंदनाचा मित्र आहे.  मिश्रा जेव्हाही बंगळुरू येत होता त्याचा पाहुणचार हीच करत होती. पण गेल्यावेळी अमित मिश्रा बंगळुरू आला त्याने वंदनाच्या फोन कॉलकडे दुर्लक्ष केले. 

रिपोर्टनुसार २५ सप्टेंबर रोजी वंदना क्रिकेटर अमित मिश्राला भेटण्यासाठी बंगळुरूला रिट्स कार्लटन हॉटेलमध्ये गेली होती. मिश्रा या हॉटेलमध्ये थांबला होता. वंदना कशी तरी हॉटेलमध्ये दाखल झाली. मिश्रा जेव्हा पुन्हा हॉटेलमध्ये आला तेव्हा परवानगी शिवाय हॉटेलच्या रूममध्ये वंदनाला पाहून भडकला. 

एफआयआरनुसार वंदना म्हणाली, अमित मला मारायला लागली आणि इलेक्ट्रॉनिक किटली चेहऱ्यावर मारली. मदतसाठी तिने आरडाओरडा केला. माझा हात त्याने पिरगळला. त्यामुळे डाव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली. एवढे झाले तरी मी हॉटेलच्या रूममध्ये बसली आणि हिंसक का झाला असा प्रश्न विचारला, त्यावर त्याने घाण घाण शिव्या दिल्या. मला रस्त्यावर पडलेली म्हटला. त्यानंतर रडत रडत मी रूमच्या बाहेर आल्याचेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.