वर्ल्डकप २०१५ : ३० खेळाडूंची नावे जाहीर, प्रमुख पाच खेळाडूंना डच्चू

भारतीय क्रिकेट मंडळाने वर्ल्डकप २०१५साठी संभावित ३० खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात पाच खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय.

PTI | Updated: Dec 4, 2014, 03:43 PM IST
वर्ल्डकप २०१५ : ३० खेळाडूंची नावे जाहीर, प्रमुख पाच खेळाडूंना डच्चू title=

मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळाने वर्ल्डकप २०१५साठी संभावित ३० खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात पाच खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय.

वर्ल्डकप २०१५साठी टीम इंडियाचा संघ जाहीर झालाय. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन सिंग, झहीर खान आणि युवराज सिंग यांचा पत्ता कापण्यात आलाय. वर्ल्डकपच्या संभाव्य या खेळाडूंचा टीममध्ये समावेश नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

संभाव्य भारतीय संघ -

एम. एस. धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू,अमित मिश्र, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सामी, उमेशा यादव, वरुण एरॉन, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, आशोक डिंडा, कुलदीप यादव, मुरली विजय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.