क्रिकेटर नसतो तर हवाई दलात असतो - राहणे

 मी क्रिकेटर नसतो तर भारतीय हवाई दलात अधिकारी असतो, लहानपणापासून मला हवाई दलात अधिकारी बनायचे स्वप्न होते, असे भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज अजिंक्य राहणेने सांगितले. 

Updated: Sep 4, 2015, 07:56 PM IST
क्रिकेटर नसतो तर हवाई दलात असतो - राहणे  title=

मुंबई :  मी क्रिकेटर नसतो तर भारतीय हवाई दलात अधिकारी असतो, लहानपणापासून मला हवाई दलात अधिकारी बनायचे स्वप्न होते, असे भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज अजिंक्य राहणेने सांगितले. 

'बीसीसीआय डॉट टीव्ही' शी बोलताना रहाणेने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जुनिअर खेळाडू असताना आलेले अनुभवही त्याने यावेळी सांगितले 

त्याने सांगितले की, ज्युनिअर क्रिकेट खेळताना मला एका बाऊंसरमुळे जखम झाली होती. त्यानंतर मी लगोपाठ पाच चौकार मारले होते. 

त्याचे आवडते क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आहे. तसेच त्याला अमेरिकन पॉप संगीत ऐकायला आवडते, असेही रहाणेने सांगितले. 

२७ वर्षीय रहाणेने आतापर्यंत १८ टेस्ट आणि ५८ वन डे मॅच खेळले आहेत. तसेच १३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत ३३३१ धावा केल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.