भारताचा वर्ल्डकपमधील पराभव धोनीमुळेच - योगराज सिंग

भारताच्या वर्ल्डकपमधील पराभवाला महेंद्र सिंह धोनी सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केला आहे. तसंच धोनीमुळेच युवराज सारखे खेळाडू आज टीमबाहेर असल्याचा आरोप योगराज सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

Updated: Apr 1, 2015, 01:00 PM IST
भारताचा वर्ल्डकपमधील पराभव धोनीमुळेच - योगराज सिंग  title=

दिल्ली : भारताच्या वर्ल्डकपमधील पराभवाला महेंद्र सिंह धोनी सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केला आहे. तसंच धोनीमुळेच युवराज सारखे खेळाडू आज टीमबाहेर असल्याचा आरोप योगराज सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

धोनीच्या मनमानीमुळेच युवराज, गंभीर, सेहवाग, उथप्पा यांसारख्या खेळाडूंना टीममध्ये स्थान मिळालं नाही. तसंच सेमीफायनलमध्ये भारत पराभूत झाल्यानंतर इथं अनेक भारतीय फॅन्स रडत असतांना धोनीनं पत्रकार परिषदेला हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जाणंही योगराज सिंह यांना आवडलेलं नाही. भारताच्या कॅप्टनचं असं वागणं भारतीय फॅन्ससाठी त्रासदायक आहे. 

ही पहिली वेळ नाही की योगराज यांनी धोनीवर आरोप केले. यापूर्वी वर्ल्डकप सुरू असतांनाही युवराजला टीममध्ये जागा न मिळण्याला धोनी कारणीभूत असल्याचा आरोप योगराज यांनी केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.