नवी दिल्ली : येत्या २४ फेब्रुवारीपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होतेय. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला टी-२० मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघाला आशिया कपमध्ये विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. सहा मार्चपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. बांगलादेश या स्पर्धेचे यजमानपद भूषवतोय.
आशिया कप स्पर्धेबद्दलच्या या १० गोष्टी
१९८४पासून आशिया कप स्पर्धा खेळवली जातेय.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच वेळा जेतेपद मिळवलेय. तर तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेय.
श्रीलंकेनेही पाचवेळा जेतेपद पटकावले असून सहा वेळा त्यांना उपविजेतेपद मिळालेय.
१९८४मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर यंदाची स्पर्धा ही १३वी स्पर्धा असणार आहे.
१९९३मध्ये ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पाकिस्तान आणि भारतादरम्यान राजकीय संबंध तणावाचे असल्याने ही स्पर्धा झाली नव्हती.
१९८३नंतर २००८मध्ये पाकिस्तानने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. यात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
विशेष म्हणजे, या स्पर्धेत एकदाही भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आलेले नाहीत.
२०१४मध्ये पाकिस्तानने या स्पर्धेचे जेतेपद उंचावले होते.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहेत.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे सर्वाधिक ३० विकेट आहेत.