अबुधाबी : पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज युनिस खान याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी इंग्लड विरूद्ध खेळण्यात येणारा पहिला डे-नाइट सामना हा अखेरचा सामना असणार आहे.
मीडियासाठी तयार करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात युनिस म्हटला की कोणत्याही क्रिकेटरसाठी निवृत्ती घेणे खूप अवघड गोष्ट असते.
युनिस म्हणाला, मी भाग्यवान आहे, टी-२० इंटरनॅशनल आणि वन डे सामन्यातून कधी निवृत्ती घ्यायची याचा निर्णय मी स्वतः घेता आला.
विशेष म्हणजे वर्ल्ड कप सामन्यांनंतर दुर्लक्ष करण्यात आलेला युनिसला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे.
३७ वर्षीय या खेळाडूने आतापर्यंत २६४ वन डे सामने खेळले आहेत. त्याने १६ वर्षांपूर्वी फेब्रुवारी २००० मध्ये कराचीत श्रीलंकेविरूद्ध आपला डेब्यू केला होता. बुधवारी आपला अंतीम वन डे सामना खेळण्यापूर्वी युनिसने सात शतक आणि ४८ अर्धशतक बनविले आहेत. त्याने एकून ७२४० धावा काढल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.