युवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.

Intern Intern | Updated: Apr 6, 2017, 04:06 PM IST
युवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं title=

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.

युवराजने आपल्या खेळीनंच नाही तर वागण्यानंही उपस्थितांची मनं जिंकली. त्याच्या या वागण्यातून त्याची खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली.

तर झालं असं की, १३व्या ओव्हरमध्ये युवराजने अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. या ओव्हरमध्ये त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावत १८ धावा फटकावल्या.

या ओव्हरमध्येच युवराजचा एक कॅच अरविंदने गमावला. फॉर्ममध्ये असलेल्या युवराजची विकेट गमावल्याने अनिकेत जास्तच उदास झाला. यावेळी त्याला हिंमत देण्यासाठी युवी अनिकेतकडे गेला. त्याने त्याच्याशी हात मिळवून त्याला प्रोत्साहन दिलं.

नंतर प्रेक्षकांनीही त्याच्या या कृतीला टाळ्यांनी दाद दिली. समीक्षकांनीही त्याचं कौतुक करत होते. त्यांनी युवराजच्या प्रगल्भतेचं कौतुक केलं