मुंबई : क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर रात्री उशीरा युवराज सिंग आणि हेजल किच इंडोनेशियातील बालीहून मुंबईत परतले. यावेळी साखरपुड्याबाबत मीडियानंच प्रश्न विचारताच हेजलने या प्रश्नाबाबत अद्यापही मौन बागलंय.
अधिक वाचा : युवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा
युवीने हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. यावेळी त्याच्या सोबत किच होती. युवीचे आणि किच यांचे अनेक दिवसांपासून डेट सुरु होते. मात्र, साखरपुड्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हेजल किच ही अभिनेत्री, नृत्यांगना, कॉमेडीयन आणि मॉडेल आहे. दरम्यान, युवीने या वृत्ताचे समर्थन केलं. त्याचवेळी हेजलने मौन बाळगले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.