युवीचं स्ट्राँग कमबॅक, कटक वनडेमध्ये सेंच्युरी

वनडे क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं जोरदार कमबॅक केलं आहे.

Updated: Jan 19, 2017, 04:38 PM IST
युवीचं स्ट्राँग कमबॅक, कटक वनडेमध्ये सेंच्युरी  title=

कटक : वनडे क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं जोरदार कमबॅक केलं आहे. कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये युवराजनं सेंच्युरी झळकावली आहे. युवराजचं वनडे क्रिकेटमधली ही 14वी सेंच्युरी आहे, तर इंग्लंडविरुद्धची ही त्याची चौथी सेंच्युरी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकवायला युवराजला तब्बल पाच वर्ष नऊ महिने आणि 30 दिवसांची वाट पाहावी लागली होती. याधी युवराजनं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती.

कटक वनडेमध्ये टॉस जिंकून इंग्लंडनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मॅचच्या सुरुवातीलाच तीन धक्के बसल्यामुळे भारताची अवस्था 25/3 अशी झाली, पण यानंतर युवराज आणि धोनीनं भारताला सावरलं. याआधी धोनी आणि युवराजमध्ये 50 रनपेक्षा जास्तची पार्टनरशीप 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झाली होती.