टीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंहच्या वडिलांना अटक

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना आज अटक झालीय. शेजाऱ्यांसोबत भांडण केल्याच्या आरोपात पंचकुला पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Updated: Aug 25, 2014, 01:03 PM IST
टीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंहच्या वडिलांना अटक  title=

चंदीगढ: टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना आज अटक झालीय. शेजाऱ्यांसोबत भांडण केल्याच्या आरोपात पंचकुला पोलिसांनी त्यांना अटक केली. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पंचकुला सेक्टर-2च्या पार्किंगवरून माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता योगराज सिंहचा आपल्या शेजाऱ्यांसोबत भांडण झालं. योगराज यांनी शेजाऱ्याला मारहाण केली. त्यामुळं योगराज सिंह यांना अटक करण्यात आलीय. 

या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पंचकुलाच्या सेक्टर-6मधील सरकारी हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं गेलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.