www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झोलोचा ‘एल टी ९००’ हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फोरजी एलटीई सपोर्ट करतो. ‘फोरजी कनेक्टिव्हिची’ सुविधा असणारा हा सध्या भारतात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरलाय. ऑनलाईन शॉपिंग साईट्वर या फोनची विक्री सुरु झालीय.
हा स्मार्टफोन TDD LTE बँड्सला सपोर्ट करतो. यामध्ये एक सिम कार्ड वापरता येऊ शकतं... तसंच १२८० X ७२० पिक्सल रेझोल्युशन असणारा ४.३ इंचाचा हाय डेफिनेशन आयपीएस डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये ग्लास सोल्यूशनसोबतच कॉर्निंग ग्लास प्रोटेक्शनही वापरण्यात आलंय. यात १.५ गीगाहर्टझ ड्युएल-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एस-४ प्रोसेसर, ३८४ मेगाहर्टझ एड्रिने २२५ जीपीयू आणि एक जीबी रॅम उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अँन्ड्रॉईड ४.२ जेलीबीनवर चालतो.
झोलो एलटी ९०० मध्ये मागच्या बाजुला ड्युएल-एलईडी फ्लॅश आणि बीएसआय सेन्सरसहीत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा तसंच एक मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. ८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ३२ जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्यानं याची मेमरी वाढवता येऊ शकते.
१८१०mAHची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे यामध्ये टूजी नेटवर्कवर १५ तासांपर्यंत टॉकटाईम आणि ३६२ तासांपर्यात स्टँडबाय टाईम मिळू शकतो. ‘फोर जी’शिवाय कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये वाय-फाय, ब्लू टूथ, जीपीएस/एजीपीएस आणि थ्रीजीचाही समावेश आहे. या मोबाईलची किंमत आहे १७,९९९ रुपये आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.